प्रतिनिधी सतीश कुसराम
गडचिरोली जिल्ह्यातील,आरमोरी येथून किमान २ किमी अंतरावर दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोज रविवारला,गाढवी नदीजवळ अपघात झाल्याचे कळताच,मा.संदीपजी ठाकूर शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी तत्काळ अपघातग्रस्त स्थळाला भेट देऊन,रूग्णाला रूग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाउपलब्ध करून दिली.त्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी रूग्णाला आरमोरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले,यावेळी मा.निखिलजी धोडरे शिवसेना तालुका प्रमुख चामोर्शी, रणेन मंडल शिवसेना जिल्हा प्रमुख (बंगाली आघाडी) गडचिरोली,मा.स्वप्निलभाऊ चिंतलवार कामगार सेना जिल्हा प्रमुख गडचिरोली,मा.उमेशभाऊ गोयल शिवसेना उपजिल्हा प्रमुख यासह शिवसैनिकांनी, रूग्णवाहिकेने रुग्णाला रूग्णालयात
पोहचविण्यासाठी मदत केली.