प्रतिनिधी गौरव बुरांडे
रेगडी नजीकच्या मुलचेरा तालुक्यातील गरंजी टोला येथे कोंबडा बाजारावर सिक्सटीच्या जवानांनी जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकून कारवाई केली.
सदर कारवाईमध्ये अनेक गाड्या, झुंज लावण्यासाठी आणलेले कोंबडे जप्त केल्याचे बोलल्या जात आहे. पोलीस पथकाची चाहुल लागताच अनेक जण मिळेल त्या दिशेने पळून केले.
सदर कोंबडे बाजार हा गावकऱ्यांच्या वतीने भरवण्यात येत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाल्यामुळे कोंबडे बाजार भरण्याच्या ठिकाणी दिनांक २१ सप्टेंबर रोजी रेगडी पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या गरंजी टोला येथे सीसिक्सटी जवानांच्या पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकली. त्यामुळे परिसरातील कोंबडे बाजार भरवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सदरच्या करावीत शेकडो बाजार शौकिन व दुचाकी,चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केल्याचे बोलले जात आहे
पुढील तपास रेगडी पोलीस करीत आहेत.