गोंडपिपरीत विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी…

153

गोंडपिपरी प्रतिनिधी शरद कुकुडकर 

कुशल कामगार,बांधकाम कारागीर यांचे आराध्य दैवत भगवान विश्वकर्मा यांची जयंती दि.(१७) बुधवारी गोंडपिपरीत उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी बांधकाम व्यावसायिक ठेकेदार कामगारांनी आपल्या कामाच्या साधनांची व यंत्रांची विधिवत पूजा करून व्यवसायात व कामात प्रगती व्हावी अशी प्रार्थना करत गोंडपिपरी शहरात शोभायात्रा काढून उपस्थित नागरिकांना मसाला भाताचे वितरण करून उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.यावेळी घनश्याम नुतिलकंटावार,शामा चौधरी,रामदास कोसरे,सुरेश पेदिलवार,शंकर सोनटक्के,भैयाजी कोहपरे ,शुभंम ताडशेटिवार,भुवन राहावे,राजू निकोडे,धर्मा नगारे,सचिन चापले,सूनिल रोहनकर, विश्वनाथ भोयर,संजू निकोडे,कामदेव बोरकुटे,प्रविण चापले यांची उपस्थिती होती.