दारूच्या नशेत दुचाकी स्वाराडुन एसटी चालकास बेदम मारहाण – चालक गंभीर जखमी….

269

प्रतिनिधी प्रीतम गग्गुरी

मुलचेरा : तालुक्यातील सुंदरनगरजवळ दि १८ सप्टेंबर २०२५ रोज गुरुवारला दुपारच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहकावर मद्यधुंद दुचाकीस्वाराने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

गडचिरोली-मूलचेरा मार्गे अहेरीकडे जाणारी एम एच १४ एल एक्स ५१७७ ही बस दुपारी १२:३० वाजता गडचिरोलीवरून सुटली. चालक सेवाभावी दराडे आणि वाहक सुहास हंबर्डे बससह दुपारी ३:१५ वाजता मूलचेराला पोहोचले. सुंदरनगरजवळ रस्त्यावरील खड्यांमुळे बस थांबविण्यात आली. दरम्यान, व्यंकटेश गजलवार (रा. कोपरअली) हा दुचाकीने अतिशय मद्यधुंद अवस्थेत समोरून येत होता. त्याने बससमोरच दुचाकी आडवी लावली. वाहक हंबर्डे यांनी दुचाकी बाजुला करण्याची विनंती केली असता, गजलवार याने शिवीगाळ करत हंबर्डे यांच्यावर हल्ला चढविला. त्यानंतर मुलचेरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल आली

बस वाहक सुहास हंबर्डे हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मुलचेरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला जेरबंद केले. जखमी वाहकावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पुढील तपास सहायक उपनिरीक्षक ऋतुजा खापे करीत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चालक व वाहकांनी बससेवा बंद ठेवण्याचा इशारा दिल्याची माहिती पुढे आली आहे.