प्रतिनिधी सतीश कुसराम
गडचिरोली :- राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत
व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल उद्या, शुक्रवार १९ सप्टेंब रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ११.४५ वाजता गडचिरोली येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत नागरिकांचे निवेदन स्विकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे राखीव. दुपारी १.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे महसुल मंत्री यांच्यासमवेत विविध विषयांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद. सायंकाळी ५.३० ते सायंकाळी ७ वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सायंकाळी ७ ते ८.३० वाजता महसुल मंत्री यांच्या समवेत विविध ठिकाणी सदिच्छा भेटी व रात्री गडचिरोलीत मुक्काम.







