Home Breaking News ऐका हो ऐका चंद्रपूर मनपा आयुक्तांनी शाळाच गहाळ केली. माजी नगरसेवक सचिन...

ऐका हो ऐका चंद्रपूर मनपा आयुक्तांनी शाळाच गहाळ केली. माजी नगरसेवक सचिन भाऊ भोयर यांचा आरोप…

221

सहसंपादक श्याम मशाखेत्री

चंद्रपूर: शहर महानगर पालिकेचा भ्रष्ट कारभार अजुन एकदा उघडकीस आला आहे. एम ई एल परिसरातील मनपा ची पंडित जवाहरलाल नेहरू शाळा नव्याने बांधकामाच्या जवळच असलेल्या एका खाजगी इमारतीत स्थलांतरित करण्यात आली होती.खाजगी इमारत मालकाशी कोणत्याही प्रकारचा लेखी करार न करता मागील तीन महिन्यांपासून मनपा त्या इमारतीत शाळा चालवीत होती.संबधित इमारतीच्या मालकाने व मुख्याध्यापिकेने मनपा आयुक्तांकडे विद्यार्थ्याच्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.परंतु या मागणीकडे आयुक्तांनी दुर्लक्ष केले.त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.वारंवार तक्रार करूनही कोणतीच कारवाई न झाल्याने शेवटी इमारत मालकाने शाळेला कुलूप ठोकले.विद्यार्थ्यांना व पालकांना शाळेच्या बाहेर ताटकळत उभे राहावे लागले.शेवटी त्या प्रभागातील माजी नगरसेवक सचिन भाऊ भोयर यांनी पुढाकार घेतला असता मनपा आयुक्तांना जाग आला. व शाळेच्या समस्या सोडवू असे आश्वासन सचिन भाऊ भोयर यांना दिले.परंतु समस्या सोडविण्या ऐवजी मनपा ने शाळा रयतवारी परिसरात हलविली. आयुक्तांच्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालक यांना नाहक त्रास सहन करावा लागला.मनपा आयुक्त विपीन पालीवाल हे कमिशन गोळा करण्यामध्येच व्यस्त आहे की काय असा प्रश्न आता पालकांना पडला आहे.

Don`t copy text!