गोंदिया – बल्लारपूर मार्गावरील रेल्वे प्रवासी गाड्या उशिराने आणि वेळेवर धावत नसल्याने प्रवाशांनी फिरविली पाठ…

173

प्रतिनिधी गौरव मोहबे

नागभीड जंक्शन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महत्वाचे ठिकाण असून

गोंदिया बल्लारपूर येथे जाण्याकरिता प्रवासी चार गाड्या धावतात मात्र कोरोना काळानंतर काही काळात प्रवासी वाहतूक खा नामदेवराव किरसान साहेब यांनी हा प्रश्न संसदेत उपस्थित केला होता यामुळे काही काळ प्रवासी वाहतूक

पण सुरळीत झाली होती आजमितीला रेल्वे वाहतूक माल वाहतुकीला महत्व देते की काय? यामुळे प्रवासी वाहतूक थांबवून माल वाहतूक जोमात होत असल्याने प्रवासी वाहतूक वेळेवर होत नाही

अनेक स्थानकावर तासनतास बसून राहावे लागत आहे.

यामुळे प्रवाशांनी स्वस्त आणि मस्त वाहतुकीकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून येत आहे यामुळे रेल्वे वाहतुकीचे नुकसान होत आहे पण प्रवासी वाहतूक सुरू असलेली कोंडी सोडवून जनतेला प्रवासाची नियमित सेवा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.