मृत बिबट आढळला…बघा कुठली आहे घटना…

119

मृत बिबट आढळला…बघा कुठली आहे घटना…

सहसंपादक श्याम मशाखेत्री

चंद्रपूर: मूल आज दुपारी सावली वनपरिक्षेत्रातील मूल तालुक्यातील टेकाडी इथे पोल्ट्री फॉर्मच्या बाजूला झुडपात बिबट असल्याची माहिती स्थानिक वनरक्षक यांना मिळाली.चंद्रपूर वनविभागाचे विभागीय वनाधिकारी व सावली वनपरिक्षेत्र श्री.धूर्वे यांच्या सूचनेनुसार बिबट्याला जेरबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.चंद्रपूर टी टी सी चे डॉक्टर व अति शीघ्र कृतिदल चे कर्मचारी ,वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. व त्या बिबट्याला बेशुद्ध करून सुरक्षित पकडण्याचा निर्णय झाला.परंतु झुडपात पाहणी केली असता तो बिबट आधीच मृत झाला होता.ही माहिती वरिष्ठ वनाधिकारी यांना देण्यात आली. व त्यांचे मार्गदर्शनात मृत बिबट्याला सावली वनपरिक्षेत्र कार्यालयात नेण्यात आले. व तिथे मृत बिबट्याचे सहाय्यक उपवनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांचेसमक्ष शवविच्छेदन करण्यात येवुन दहन करण्यात आले.