मुख्यसंपादक प्रशांत शाहा
गडचिरोली येथे जिल्हा सब जुनियर ( मुले मुली )कबड्डी निवड चाचणी चे आयोजन
अखिल भारतीय कबड्डी फेडरेशन द्वारा मान्यता प्राप्त असलेल्या कबड्डी असोसिएशन विदर्भ नागपूर या संघटनेशी सलग असलेल्या न्यू जिल्हा कबड्डी असोसिएशन गडचिरोली या संघटने द्वारा आयोजित व जय बजरंग स्पोर्ट्स & फिटनेस अकॅडमी गडचिरोली यांच्या विद्यमाने सब ज्युनिअर मुले व मुली यांची कबड्डी जिल्हा संघ निवड चाचणी दिनांक १०/०९/२०२५ रोज बुधवार ला शिवाजी महाविद्यालय धानोरा रोड गडचिरोली येथे सकाळी ठीक ९.३० वाजता पासून आयोजित करण्यात आलेले आहे. या निवड चाचणीत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंचे वय हे सोळा वर्षाच्या आतील व जन्मतारीख ०७/१०/२००९ पासून पुढे असावी व मुलांचे व मुलींचे वजन हे ५५ किलोच्या आत असणे अनिवार्य आहे. चाचणी स्पर्धेसाठी ओरिजनल आधार कार्ड व त्याची झेरॉक्स सोबत आणावी त्याशिवाय निवड स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. निवड झालेला गडचिरोली जिल्ह्याचा संघ हा विदर्भ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत सहभागी होईल. अधिक माहितीकरता कबड्डी संघटनेचे सहसचिव श्री धनराज पोटावी 9359731485 यांच्याशी संपर्क साधावा.








