ओबीसी बांधव करणार गोंडपिपरीत एल्गार दहा सप्टेंबरला भव्य मोर्चाचे आयोजन…

224

गोडपिपरी तालुका प्रतिनिधी शरद कुकुडकर

गोंडपिपरी:- मराठा समाजाने मुंबईत काढलेल्या मोर्चानंतर राज्य शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.सोबतच यापुढील काळात मराठा समाजाला ओबीसींच्या कोटयातून आरक्षण देण्याची शक्यता बळावली आहे.हा प्रकार समस्त ओबीसी बांधंवावर अन्यायकारक आहे.तो कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही असा संतप्त इशारा देत गोंडपिपरी तालुक्यातील ओबीसी बांधवांनी आता रस्त्यावर उतरून आपल्या न्यायहक्कासाठी आंदोलनाची हाक दिली आहे.येत्या 10 सप्टेंबर रोजी गोंडपिपरी येथील शिवाजी चैकातून या एल्गाराची सुरवात होणार आहे.
राज्यात मराठयांना आरक्षण मिळावे यासाठी नुकताच मुंबई येथे मोर्चा काढण्यात आला.याप्रसंगी राज्य सरकारने त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.दरम्यान मराठयांना स्वतंत्रपणे आरक्षण देण्यात यावे पण त्यांना ओबीसी कोटयातून आरक्षण देउ नये अशी मागणी ओबीसी बांधव करित आहेत.असे झाल्यास आमच्या समाजातील तरूणांना मोठया समस्यांना सामोेरे जावे लागले.मराठा समाज हा स्वयपूर्ण व संपन्न आहे.पण ओबीसी बांधव अजुनही मुख्य प्रवाहात आला नाही.ओबीसी कोटयातून मराठा बांधंवाना आरक्षण दिल्यास त्याचे अतिशय विपरीत परिणाम होणार आहेत.त्यामुळे शासनाने या अतिशय गंभीर प्रकरणी आपली भुमिका स्पष्ट करावी.कुठल्याही स्थितीत मराठयांना ओबीसी कोटयातून आरक्षण दिल्या जाउ नये यासाठी आज आपण शांत बसलो तर उदया आपली पिढी शिक्षण,नौकरी,आणि सन्मानापासून कायमची वंचित राहील.तर चला एकत्र येउया अन्यायाविरोधात आवाज बुलंद करूया असा नारा देत येत्या 10 सप्टेंबर रोजी गोंडपिपरीतील शिवाजी चैकात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.शासनाचा निर्णय आम्हाला मान्य नाही,अन्यायकारक शासन निर्णय तातडीने मागे घ्यावा अदि मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत.याप्रसंगी शासन निर्णयाची होळी देखिल करण्यात येणार आहे.याप्रंसंगी तालुक्यातील समस्त ओबीसी बांधव व समाजातील जाणकारंानी या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन गोंडपिपरी तालुका ओबीसी बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.