संपादक प्रशांत बिट्टूरवार
दिनांक ८ सप्टेंबर २०२५, रविवार रोजी दुपारी, प्रकाश नगर महाकाली कॉलरी वार्ड, येथे मा. शंकरभाऊ चापडे यांच्या निवासस्थानी वंचित बहुजण आघाडी – चंद्रपूर महानगर तर्फे बैठक पार पडली.
या बैठकीस महानगर अध्यक्ष मा. स्नेहलभाऊ रामटेके प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत प्रभागातील स्थानिक समस्या, संघटनात्मक बांधणी, तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाखा स्थापन करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. त्याचबरोबर संघटनात्मक कामकाज व इतर विविध विषयांवरही सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
या बैठकीस मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उत्साहपूर्वक उपस्थित होते. त्यामध्ये प्रमुख उपस्थिती:
सारंगजी सहारे (महासचिव),डॉ. प्रज्ञाशिल सहारे (उपाध्यक्ष),मिथुन काटकर,(कोषाध्यक्ष),हरीश इंदूरकर (उपाध्यक्ष),संघपाल सरकते (उपाध्यक्ष),शंकरभाऊ चापडे,(संघटक),सुभाषचंद्र ढोलणे (सहसचिव),सुभाषजी थोरात,विक्रम बोरकर,चंद्रप्रभा रामटेके,सविता दुर्गे,राधा वाघमारे, शोभा वाघमारे,बबिता मेश्राम,ललिता दुर्गे,आशा रामटेके,सरिता दुर्गे,सूरज चंद्रगिरवार,
आदी मान्यवरांचा समावेश होता