जय नगर विक्रमपूर येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना मध्ये पक्ष प्रवेश…

422

प्रतिनिधी/सतीश कुसराम :
शिवसेना शिंदे गटाचे आरमोरी गडचिरोली विधानसभा प्रमुख संदीप ठाकूर यांचा नेतृत्वात चामोर्शी येथे कार्यकर्ता मेळावा चे आयोजन करण्यात आले होते

या कार्यक्रमात शिवसेना पक्षाचे बंगाली आघाडी जिल्हा प्रमुख रनेन मंडल,कामगार सेलचे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील चिंतलवार,जिल्हा उपप्रमुख उमेश गोयल,जिल्हा सचिव प्रशांत शाहा,तालुका प्रमुख निखिल ढोडरे,सुजित मुजुमदार, चामोर्शी शहर प्रमुख अमित यासालवार,बिजली मुजुमदार बंगाली आघाडी महिला जिल्हा प्रमुख सत्यपाल कुत्तारमारे चेतन कारेकर उपजिल्हा प्रमुख आष्टी व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

मेळाव्यात जयनगर विक्रमपूर येथील शेकडो काँगेस व भाजपचे कार्यकर्ते यावेळी पक्ष प्रवेश केला
या पक्ष प्रवेशात सर्व कार्यकर्त्यांचे शिवसेना पक्षाचे दुपट्टा टाकून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात जयनगर येथील नव नियुक्त रोहित घोष यांना बंगाली आघाडी युवासेना जिल्हा प्रमुख तर अनुप भक्त यांना युवासेना बंगाली आघाडी जिल्हा सचिव पदाचे नियुक्त पत्र देवून सन्मान करण्यात आला

कार्यक्रमात बोलताना संदीप ठाकूर म्हणाले की सर्वांनी पक्षासाठी निस्वार्थ काम करावे आणि गाव तेथे शिवसेना शाखा सुरू करावे असे निर्देश दिले.