सहसंपादक श्याम मशाखेत्री
चंद्रपूर.. भद्रावती शहरातील गणपती वॉर्डातील वेकोलि कर्मचाऱ्याने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.धम्मचक्र भगवान ठमके असे मृतकाचे नाव आहे.मृतक दारूच्या व्यसनामुळे नोकरीवर जात नसल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.घरी कोणीही नसतांना त्याने छताला दोरी बांधून आत्महत्या केली.त्याची पत्नी घरी आल्यावर घटनेचा उलगडा झाला.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास भद्रावती पोलिस करीत आहे…
जिल्ह्यातील काही शाळांकडून त्या आदेशाची अवहेलना..
चंद्रपूर…जिल्हा प्रशासनाने हिंदू सणासाठी जाहीर केलेल्या सुट्ट्यांचे पालन न करता काही खासगी कॉन्व्हेन्ट शाळा सुरू ठेवल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे.परिषदेचे अध्यक्ष विवेक आंबेकर यांनी जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. पोळा,महालक्ष्मी या सणाच्या दिवशी शाळा सुरू ठेवण्याचा आरोप करण्यात आला आहे..