चंद्रपुरात गणेश विसर्जनात विघ्न, एकाचा मृत्यू चंद्रपूर गणेश विसर्जन दुःखद अपघात, १८ वर्षीय तरुणाचा इरई नदीत बुडून मृत्यू…

526

प्रतिनिधी गौरव मोहबे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही

चंद्रपूर – ७ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर शहरात ६ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन पार पडलं, मात्र या आनंद व उत्साहाच्या वातावरणात विघ्न आलं, दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीत गणेश विसर्जन करताना १८ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ७ सप्टेंबर रोजी आपत्ती व्यवस्थापन व पोलीस कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबवित मुलाचा मृतदेह बाहेर काढला. १८ वर्षीय दीक्षांत राजू मोडक असे मृतकाचे नाव आहे.
चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
चंद्रपूर व शहरातील इतर भागात गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात सुरु होते, दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भटाळी पूल इरई नदीच्या पात्रात सुद्धा विसर्जन सुरु होते, बेताल चौक दुर्गापूर मध्ये राहणारा १८ वर्षीय दीक्षांत राजू मोडक हा आपल्या घरी असताना दुपारी त्याच्या मित्राने फोनद्वारे गणेश विसर्जनाला जाऊ असे म्हणत बोलाविले, ते दोघेही घराजवळील बावणे यांच्या गणेश विसर्जनाला गेले.
शोधमोहिमेत मिळाला मृतदेह
दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान भटाळी पुलावर इरई नदीच्या पात्राजवळ मित्र व इतर नदी पात्रात उतरले असता दीक्षांत व एकाचा तोल गेला, त्याचवेळी दुसऱ्या मुलाला वाचविण्यास यश आले मात्र दीक्षांत बुडाल्याने तो पाण्याबाहेर आला नाही, तात्काळ याबाबत पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. बचाव पथकाने दीक्षांत चा शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही. रात्र झाल्याने पोलिसांनी शोधमोहीम थांबविली. Irai river drowning incident during Ganesh
immersion
७ सप्टेंबर रोजी पुन्हा शोधमोहीम राबवली असता सकाळी १० वाजताच्या सुमारास शोध पथकाला दीक्षांत चा मृतदेह मिळाला, दीक्षांत च्या मृत्यूने दुर्गापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुर्गापूर पोलिसांनी याप्रकरणी मार्ग दाखल केला आहे.