गौरीपूरच्या फुटबॉल स्पर्धेत विष्णुपूर अव्वल तर द्वितीय क्रमांकावर गांधीनगर…

273

प्रतिनिधी/सतीश कुसराम:
चामोर्शी तालुक्यातील गौरीपुर येथे १सप्टेंबर पासून भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
या स्पर्धेचा अंतिम सामना काल ६ सप्टेंबर ला सायंकाळी चार वाजता पार पडला या चुरशीच्या सामन्यात विष्णुपूर येथील खेडाळूंनी आपले वर्चस्व कायम राखला आहे.
या स्पर्धेचे प्रथम रु.५१ हजाराचे पारितोषिक आमदार . डॉ मिलिंद नरोटे यांचे कडून देण्यात आले
तर द्वितीय बक्षीस ३१हजाराचे डॉ तामदेव दुधबळे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांचे कडून देण्यात आले.
या स्पर्धेचे तृतीय बक्षीस ११हजाराचे जिल्हा परिषद शाळा गौरीपुर व लोकमान्य हिंदी हायस्कूल गौरीपूर यांच्या कडून देण्यात आले .
या स्पर्धेच्या काळात खेळाडूंना भोजनाची सोय म्हणून शिवसेना चे आरमोरी गडचिरोली विधानसभा प्रमुख संदीपभाऊ ठाकूर,जिल्हा उपप्रमुख उमेश गोयल,तालुका प्रमुख निखिल ढोडरे,कामगार सेल चे जिल्हाप्रमुख स्वप्नील चिंतलवार,सुजित मुजुमदार,शिवसेनेचे जिल्हा सचिव प्रशांत भाऊ शाहा यांच्या कडून करण्यात आले तर स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात भाजपचे माजी आमदार डॉ देवराव जी होळी,बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शाहा व अन्य मान्यवर उपस्थित होते.