वृक्ष लागवड करून शिक्षक दिन साजरा…

103

प्रतिनिधी सतीश कुसराम
लखमापूर बोरी :

चामोर्शी तालुक्यातील नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल, विक्रमपूर- जयनगर येथे ५ सप्टेंबर शुक्रवार ला शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आले . त्यावेळेस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म दिवशी शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुका कृषी अधिकारी कार्यालय, चामोर्शी यांच्या वतीने शाळेला मोफत रोपे वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. तालुका कृषी अधिकारी श्री. अमित तुमडाम सर यांच्या हस्ते वृक्षरोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि कार्यक्रमांच्या अध्यक्षा श्रीमती. एस.एच गयाली मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व तसेच कृषीप्रधान देशात कृषी क्षेत्र किती महत्वाचे आहे यावर प्रकाश टाकत प्रास्ताविक भाषण पूर्ण केले.
प्रमुख अतिथी श्री. अमित तुमडाम सर यांनी विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राची माहिती मिळावी, कृषी क्षेत्रात मुलांना आवड निर्माण व्हावी या उद्देशाने कृषी क्षेत्रातील संधी, अभ्यासाची पद्धत आणि सर्वांना पर्यावरण संवर्धन करणे ही सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उप कृषी अधिकारी मा. बाळू डोंगरे सर यांनी शेतीतील बदलामुळे आरोग्यावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाय योजनांबाबत माहिती दिली. स्मिता निमगडे (सहायक कृषी अधिकारी) यांनी कृषी यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना यांसारख्या शासकीय योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तर भाग्यश्री धोटे (कृषिसेवक) यांनी कृतीपर गीत सादर करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवत मुलानी नेहमी कृतीतून शिकावे असा संदेश दिला.
या प्रसंगी शाळेतील सहायक शिक्षक मा श्री. आर. बी. कावळे सर, श्रीमती ए .ए. मंडळ मॅडम, सहायक शिक्षिका कु. एल. बी. मोशिद मॅडम तसचे शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मा. श्री. एस. पी. निखुरे सहायक शिक्षक यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन व सहकार्य असेच कायम लाभावे असे मत व्यक्त करीत उपस्थिती सर्वाचे आभार मानले.
मुलांना खाऊचे वाटप करून कार्यक्राचा समारोप करण्यात आला.