सुरक्षा दल व नक्षल मध्ये चकमक एका महिला नक्षलीचा मृत्युदेह ताब्यात…

152

मुख्य संपादक प्रशांत शाहा :

छत्तीसगडच्या दंतेवाडा-

नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवरील अबुझमाडच्या थुलथुली भागातील घनदाट जंगल परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाध्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवळपास ६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे वृत्त असून परिसरात शोध मोहीम सुरू आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी राबविलेल्या शोध मोहिमे दरम्यान घटनास्थळावरून एका महिला नक्षलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. चकमकीत मारल्या गेलेल्या महिला नक्षलवाद्याची अद्याप ओळख पटलेली नसून कुख्यात नक्षलवादी रामधरची पत्नी बिमला मारली गेल्याचा दावा करण्यात येत आहे. बिमला ही प्लाटून क्रमांक-१० ची सदस्य होती. काल, शुक्रवारी दंतेवाडा आणि नारायणपूरचे जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) पथक नक्षलवादी कारवाईसाठी गेले होते. या दरम्यान, पूर्व बस्तर विभागातील अबुझडमाडच्या घनदाट जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जवानांवर बेछूटपणे गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला. यात एका महिला नक्षिलीचा मृतदेह
गावकऱ्यांनाही मारहाण केली. दोघांच्याही पायांना आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. प्रकरणी पोलिसांना घटनेची माहिती होताच घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचे पत्रक आढळून आले. त्यात त्यांनी लिहिले की, १० एप्रिल रोजी त्याने पोलिसांना माहिती देऊन आमचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. तो २०२२ मध्ये खबऱ्या म्हणून काम करत आहे. यासोबतच त्याच्यासारख्या खबऱ्यांना आणि लोकविरोधी काम करणाऱ्यांना अशी मृत्युदंडाची शिक्षा मिळेल, असे लिहिले आहे. नक्षलवाद्यांच्या कृत्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.