आलापल्ली येथे मोटार सायकल चालणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाई…

401

आलापल्ली येथे मोटार सायकल चालणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाई…
प्रतिनिधी/प्रीतम गग्गुरी:
आलापल्ली:

मा.पोलीस अधिक्षक, श्री. निलोत्पल सो. गडचिरोली यांनी शहरातील वाहतुक शिस्तबध्द पध्दतीने होवुन अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी बेजबादार वाहनचालकावर कडक कायदेशिर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याने त्या अनुषंगाने आज दिनांक २८/०८/२०२५ रोजी आलापल्ली शहरात मोहीत राययुन वाहतुकीच्या नियमाचे उल्लघंन करणा-या वाहन चालकावर कायदेशिर कारवाई करण्यात आली. यादरम्यान करण्यात आलेल्या तपासणीत १२ अल्पवयीन मुले वाहन चालवितांना मिळून आले. १२ मोटार सायकल धारकावर दंड आकारुन १२ मोटार सायकल डिटेन करण्यात आले व यापुढे अल्पवयीन मुले मोटार सायकल चालवितांना आढळुन आल्यास संबंधी पालकावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल.

मा. श्री निलोत्पल, सा. पोलीस अधिक्षक गडचिरोली, मा.श्री. सत्यसाई कार्तीक सा. अपर पोलीस अधिक्षक अहेरी व मा.श्री. अजय कोकाटे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि हर्षल ओकरे, सपोनि देवेंद्र पटले, पोहवा/विजय कुमरे, नापोशि // ज्ञानेश्वर निलायार, मपोशि / पुजा पाटील यांनी सदरची कारवाई केली आहे.