प्रतिनिधी/संकेत कायरकर:
मा. रवींद्रजी चव्हाण (प्रदेशाध्यक्ष, भाजप) यांच्या अध्यक्षतेखाली, मा. श्री. हंसराजजी भैया अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार श्री. करण संजय देवतळे यांच्या विशेष उपस्थितीत, भद्रावतीतील प्रतिष्ठित मान्यवरांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेऊन झालेला जाहीर प्रवेश हा पक्षाच्या वाढत्या प्रभावाचे द्योतक आहे.
भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष श्री. अनिल धानोरकर, माजी नगरसेवक श्री. प्रशांत झाडे, श्री. प्रमोद नागोसे, श्री. विनोद वानखेडे, श्री. निलेश देवाईकर, श्री. संदीप कुमरे, माजी नगरसेविका सौ. रेखाताई राजुरकर, सौ. लिलाताई ढुमने , सौ. प्रतिभाताई निमकर, सौ. शारदाताई ठवसे, सौ. शुभांगीताई उमरे, श्री. प्रवीण महाजन व श्री. मंगेश मते यांनी जाहीर प्रवेश करून भाजपचा किल्ला अधिक भक्कम केला आहे.
पक्षप्रवेशावेळी श्री. सुनील नामोजवार, श्री. शामसुंदर उरकुडे, श्री. प्रशांत डाखरे, श्री. किशोर बावणे, श्री. अफजलभाई खान व श्री. सत्तारभाई शेख हे उपस्थित होते.
या प्रवेशामुळे वरोरा-भद्रावतीतील भाजप परिवाराची ताकद केवळ संख्यात्मकच नव्हे, तर सामाजिक व राजकीय स्तरावरही अधिक बळकट झाली आहे. जनतेच्या विश्वासाने व कार्यकर्त्यांच्या सामर्थ्याने भाजप वरोरा-भद्रावतीच्या विकासयात्रेला वेग देत आहे.







