*पोलिसांनी तीन किलोमीटर चे अंतर पार करीत आणला मृतदेह…*

230

*पोलिसांनी तीन किलोमीटर चे अंतर पार करीत आणला मृतदेह…
जिल्हा संपादक श्याम मशाखेत्री
चंद्रपूर:
राजुरा विरुर मुंडीगेट या मध्य रेल्वेने प्रवास करणारा एक 24 वर्षीय युवक रात्री साडे नऊ वाजता चे सुमारास रेल्वेतून खाली पडल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली.

सदर मार्गावर घनदाट जंगल असल्याने त्या भागाने कोणतेही वाहन जाऊ शकत नव्हते.अशावेळी पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तीन किलोमीटर चे अंतर कापत रात्रीच्या किर्र अंधारात मृतदेह शोधून काढला. व मृतदेह पोलिस स्टेशन ला आणला.मृतदेहाची ओळख केली असता सदर युवक बिहार राज्यातील असल्याची माहिती मिळाली.मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय इथे ठेवण्यात आले आहे.