*संस्थापक अध्यक्ष जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था.*
प्रतिनिधी/छत्रपती संभाजीनगर:
आपले छत्रपती संभाजीनगर म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर होय.आणि त्या निमित्ताने शहरा मध्ये देशी विदेशी पर्यटकांचा सतत राबता असतो.शिवाय अलिकडील काळात शहरा मध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री आसणारे मोठमोठी हाॅस्पीटल शहर आणि परिसरात उभी राहिलेली आहेत.परंतु पर्यटक असोत की रूग्ण आसोत या सर्वाचे आगमन शहरा मध्ये होताच त्यांचे स्वागत रोडवर पडलेली मोठमोठी खड्डे करतात.त्या मुळे रुग्ण वाहिकांच्या चालकांना रुग्ण वाहिका चालवतांना अक्षरशः तारेवरील कसरत करावी लागते.आणि त्या मागील कारणे देखील तसीच आसतात.
म्हणजे रुग्ण जर अत्यंत नाजूक परस्थितीत आसेल तर त्यांना ऑक्सीजन लावलेला असतो.मुत्र विसर्जनासाठी पिशवी असते तर कधी कधी आपल्या माता भगिनी डिलेव्हरीच्या शेवटच्या टप्प्यात आसतात.तर अनेकदा सीझर झालेले आसल्या कारणाने टाके ओले आसतात.त्या मुळे पेशंटच्या काळजी पोटी रुग्णवाहिकेचे चालक अक्षरशः गाडी चालवतांना रडकुंडीला आलेला आसतात.परंतु याचे सोयर सुतक राज्य कर्त्यांना मुळीच नसते.
राज्य कर्ते मतांचा गल्ला भरणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा सरकारी स्तरावर, सरकारच्या वतीने प्रचंड गाजावाजा करण्यात आला.परंतु स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते आपघात योजना असो की केंद्रीय कैशलेस रस्ते आपघात योजना आसो.या योजनांचा मात्र योग्य प्रमाणावर प्रचार प्रसार न झाल्या मुळे अपघात ग्रस्तांना सामान्य नागरिक आसोत, पोलीस आसोत की आपल्या राज्याचे दस्तुरखुद्द विरोधीपक्ष नेते आसोत.आपघात ग्रस्तांना सरळ उचलतात आणि घाटीचा रस्ता दाखवतात.
एक तर अडगळीत आसणारे घाटी रुग्णालय आणि त्यात कहर म्हणजे आपल्या शहरातील खड्डेमय रस्ते.मग रुग्णाचे प्राण वाचणार कसे?