महा अवयवदान रॅलीमध्ये एस आर एम कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली, चंद्रपूर यांचा सक्रिय सहभाग…

444

आज दिनांक 3 आगस्ट 2024 रोज शनिवार ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ,चंद्रपूर तर्फे *अवयव दान जनजागरूकता अभियान* अंतर्गत भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले. जुलै 2024 ते 3 ऑगस्ट 2024 पर्यंत विविध स्पर्धांच्या माध्यमातून अवयव दानाची जनजागरूकता करण्यात आली . त्याच कार्यक्रमातील एक भाग म्हणून 3 आगस्ट 2024 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर इथून अवयव दान जनजागरूकता रॅली काढण्यात आली.

त्या रॅली च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध अवयव दानाच्या संदर्भात घोष वाक्ये देऊन तसेच जेटपुरा गेट व रामनगर चौक येथे पथनाट्य सादर केले व त्यातून अवयव दानाची जागरूकता केली. अश्या या अवयवदान जनजागरूकता रॅलीत *सुशीलबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली , चंद्रपूर च्या प्राचार्य(प्रभारी) डॉ .जयश्री कापसे यांच्या नियंत्रणात तसेच डॉ. देवेंद्र बोरकुटे व डॉ. किरणकुमार मनुरे यांच्या मार्गदर्शनात एम एस डब्ल्यू च्या वैद्यकीय व मन:चिकित्सक समाजकार्य या विशेषीकरणाचे विद्यार्थी व बीएसडब्ल्यू फर्स्ट इयरचे संपूर्ण विद्यार्थी महाअवदान रॅलीत सहभागी झाले होते.

महाअवयवदान रॅलीचे विसर्जन व समारोपीय कार्यक्रम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथे घेण्यात आला.या कार्यक्रमात मागील दिवसात झालेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. या समारोपिय कार्यक्रमाकरिता विशेष अतिथी म्हणून मा.श्री श्रीकांत देशपांडे (अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रपूर ) , मा.ऍड सुमित जोशी (सेकरेटरी जिल्हा वि. से. प्रा. चंद्रपूर)मा.डॉ अशोक काचोळे (D.H.O Z.P. CHANDRAPUR)मा. डॉ. मिलिंद कांबळे (Dean GMC) महाविद्यालयातर्फे रॅलीचे समन्वयक म्हणून डॉ. देवेंद्र बोरकुटे, डॉ. किरणकुमार मनुरे हे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी अवयव दानाबद्दल माहिती देऊन समाजात जनजागरूकता करण्याचे आव्हान विदयार्थ्यांना केले.

रॅलीचे विसर्जन व समारोपय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राकेश शेंडे, समाजसेवा अधीक्षक तर आभार श्री उमेश आडे, समाजसेवा अधिक्षक यांनी मानले. रॅलीचे नेतृत्व व रॅलीचे नियोजन श्री भास्कर झलके, श्री उमेश आडे, श्री हेमंत भोयर, श्री तानाजी शिंदे, श्री राकेश शेंडे, तसेच नगरकर मॅडम यांनी व्यवस्थितरित्या पार पाडले.