गोंडपिपरीतील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…. विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी केले स्वागत.

590

गोंडपिपरी-तालुक्यातील विविध पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काल (दि. २१) भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.
भाजपा गोंडपिपरी कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी सर्व नवप्रवेशीतांच्या गळ्यात पक्षाचे दुपट्टे टाकून भाजप परीवारात स्वागत केले.
यामध्ये शिवसेना (उ.बा.ठा) चे शहराध्यक्ष रियाज कुरेशी, करंजीचे सामाजिक कार्यकर्ते रितीक लोणारे, सुमीत पिंगे, अब्दुल आहद, अब्दुल सय्यद, अल्तमस शेख, कार्तिक कन्नाके, अनिकेत मांडवगळे, ओकेश लोणारे, अमित भोयर, साहिल बट्टे, उमेश भोयर, विशाल चंद्रगीरीवार, शुभम कलगटवार, नितेश कलगटवार, रीतीक चिलनकर, निखील चौधरी, लोमेश नागापूरे आणि जयंत कोहपरे यांचा समावेश आहे.
याप्रसंगी देवराव भोंगळे यांनी या सर्वांच्या गळ्यात पक्षाचे दुपट्टे टाकून भाजप परीवारात मनःपुर्वक स्वागत केले.
याप्रसंगी बोलताना, विश्वगौरव, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाने प्रभावित होत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. येत्या काळात गोंडपिपरी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी या सर्व युवा मित्रांचे सहकार्य लाभणार आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व या भागाचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. असा विश्वास देवराव भोंगळे यांनी सर्वांना दिला.
यावेळी माजी पं. स. सभापती दिपक सातपुते, माजी जि. प. सदस्य अमर बोडलावार, शहराध्यक्ष चेतन गौर, सुहास माडूरवार, राकेश पुन, वैभव बोनगीरवार, स्वप्निल बोनगीरवार, रमेश डिंगलवार, गणेश मेरूगवार, गणेश डहाळे, पंकज चिलनकर, मनोज वनकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.