वरोरा: महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन महाविद्यालयामध्ये ५वे योग व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन दिनांक 20 एप्रिल ला महारोगी सेवा समिती अंतर्गत व्यवस्थापक सौ.पल्लवी आमटे यांच्या हस्ते करण्यात आले होते.20 दिवस चाललेल्या या शिबिराचा समारोप समारंभ दि.10 मे ला मोठ्या उत्साहात पार पडला.या समारोप समारंभासाठी अध्यक्ष म्हणून महारोगी सेवा समिती,आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, तसेच विशेष अथिती आयएएस नाओमी साटम, ए एस पी वरोरा उपविभाग, प्राचार्य डॉ मृणाल काळे आणि उपप्राचार्य प्रा. राधा सवाने या सर्व पाहुण्यांच्या उपस्थिती मध्ये 20 दिवस अविरत पणे पेटत असलेल्या मशालीची ज्योत शांत करून तसेच शिबिराच्या ध्वजाचे ध्वजाअवतरण करून पाचव्या योग व क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभाला सुरुवात झाली.
शिबिरातील सर्वात लहान वयोगटातील शिबिरार्थांच्या घुंगरू काठी कवायती पासून प्रात्यक्षिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.त्यानंतर बघणाऱ्याचे डोळे स्तब्ध होतील अश्या भारतीय पारंपारिक क्रीडा प्रकारातील प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन करण्यात आले. त्यामध्ये घुंगरू काठी, रेला नृत्य, सोबतच डंबेल्स,लाठी बंदिश,योगा, एरोबिक नृत्य, लाठी ,कराटे, लेझीम, दंडबैठक, योगासन अश्या प्रकारच्या कवायती आणि चित्तथरारक अश्या जळती बनेटी, जोडी कवायत , पुरलेला मल्लखांब, रोप मल्लखांब, टांगता मल्लखांब, एरियल सिल्क याचे सुद्धा प्रात्यक्षिक शिबिरार्थ्यांनी सादर केले.या शिबिरामध्ये वय वर्ष ०५ ते ७५ वयोगटातील ७३५ शिबिरार्थ्यांनी २८ विविध क्रीडा प्रकरांमध्ये मल्लखांब, रोप मल्लखांब, कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल, हँडबॉल, फुटबॉल, कराटे, तायक्वांदो, बॉक्सिंग, वुशू, अॅथलेटिक्स, लॉन टेनिस, क्रिकेट, बॉल बॅडमिंटन, आर्चरी, तलवारबाजी, सॉफ्ट बॉल, नेटबॉल, वेट लिफ्टिंग, टेबल टेनिस, सेपक टकरा तसेच यावर्षी नव्याने समाविष्ट करण्यात आलेला एरियल सिल्क व भारतीय पारंपरीक व्यायाम प्रकारांचे प्रशिक्षण घेतले.
या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी डॉ. प्रशांत बोकारे बोलताना म्हणाले की शिबीरामध्ये मुलांना योग्य संस्कार आणि वळण लावण्याचे काम केल्या जाते.असल्या प्रकारचे शिबिर घेऊन समाजाबद्दल विचार करणारे ही संस्था आणि महाविद्यालय आहे. याप्रसंगी त्यांनी शिबिरार्थी यांच्या पालकांचे विशेष कौतुक केले.आणि या शिबिराच्या माध्यमातून लवकरच उत्तम दर्जाचे खेळाडू निर्माण होतील असा विश्वासही व्यक्त केला. विद्यार्थ्याच्या
सर्वांगीण विकासासाठी खेळ हा अतिशय महत्वाचा आहे. आणि खेळामधूनच नेतृत्व गुणवत्ता निर्माण होते. तसेच क्षेत्र कोणतेही असो खेळ व व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे. असे प्रतिपादन आयएएस नाओमी साटम यांनी केले.
बाबा आमटे म्हणायचे चांगल्या कामा साठी हजारो प्रभूचे हात लागतात ही भावना सामोरं ठेऊन शिक्षक, व्यावसायिक, अधिकारी अश्या लोकांनी एकत्र येऊन 20 दिवस रोज सकाळी नास्त्याची सोय केली.
या ५ वे योग व क्रीडा शिबिरामध्ये प्रशिक्षक म्हणून ज्यांनी आपली भूमिका बजावली,तसेच हे सर्व शिबीर प्राचार्य डॉ मृणाल काळे, उप प्राचार्य राधा सवाने व प्रा. तानाजी बायस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत पणे काम करून ज्यांनी सांभाळले असे शिबिर संयोजक अमेय नागापुरे, सहसंयोजक धीरज कुंडगीर आणि एकूण 60 प्रशिक्षकांना सुद्धा प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षीय भाषण करताना डॉ. विकास आमटे यांनी देखील महाविद्यालयाचे, संपूर्ण शिबिराचे कौतुक केले. हे शिबीर मुलांना मोबाईल पासून दुर ठेवत आणि त्या त्यामधून मुलांना चांगली वळण लागते. सामोर बोलतांना त्यांनी आपल्या तरुण वयातील काही गोष्टींना उजाळा दिला. भविष्यात जलतरण तलाव बांधून दिव्यांग, कुष्टरुग्ण यांना संधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले.
या समारोपीय कार्यक्रमामध्येच शिबिरात सहभागी असणाऱ्या कस्तूर राऊत, विधी भोगेकर, आयुष महल्ले, माधुरी मज्जी, आर्यन काळे, शुभ्रा ठाकरे या सर्वांना उत्कृष्ट शिबिरार्थी पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच कु. अक्षिता तिखट व श्री विवेक दुबे यांना उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून गौरविण्यात आले. समारोपीय कार्यक्रमासाठी ७३६ शिबिरार्थी, ६७ प्रशिक्षक,१५०० पेक्षा अधिक पालक व क्रीडा प्रेमी उपस्थिती होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तानाजी बायस्कर आणि श्री महेश सोनावणे यांनी केलं तर आभार शिबिर प्रमुख प्रा. तानाजी बायस्कर यांनी मानले.







