Facebook Instagram Down: जगभरात फेसबुक, इंस्टाग्राम अचानक होत आहेत लॉगआऊट! नेमकं काय आहे कारण?

1120

जगभरात फेसबुक आपोआप लॉगऑऊट झाले आहेत. संपूर्ण फेसबुक डाऊन आहे. याबाबत अजून कोणतीही अपडेट आली नाही. इंस्टाग्राम देखील डाऊन असल्याची माहिती मिळत आहे. वापरकर्त्यांच्या मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड असे मॅसेज आले त्यानंतर फेसबुक अकाऊंट लॉगऑऊट झाले आहेत.

पुन्हा लॉगइन केल्यानंतर पासवर्ड नाकारल्या जात आहे. परंतु आपला पासवर्ड चुकीचा नाही. फेसबुकच्या होम पेजवर जाण्याऐवजी Facebook तुम्हाला आपोआप बाहेर काढेल.

तुमचा लॉग इन कालबाह्य झाला आहे असा एरर मेसेज दिसेल आणि तुम्ही परत लॉग इन करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमची क्रेडेन्शियल्स नाकारली जातील. Facebook Instagram Down

लॉगआऊट होण्याचा प्रकार इंस्टाग्राम तसेच मेसेंजरवरही होत आहे. मात्र तुमचा पासवर्ड बदलण्याची गरज नाही. सध्या फक्त सेवा खंडीत आहेत. फेसबुक यावर अधिकृत उत्तर देणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1765041005848674356?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1765041005848674356%7Ctwgr%5E370babd58ed835d6a5912e31957be423ed03adcb%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F