चंद्रपूर: बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या ट्रेड युनियन तर्फे ७४ व्या संविधान दिनाच्या निमित्ताने २३ नोव्हेंबर २०२३ ला मेन रोड चंद्रपूर येथील संविधान निर्माते परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे आणि संघटनेचे राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. प्रा.टी.डी.कोसे यांच्या हस्ते सन्मान पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे सहसचिव नवनाथ देरकर, चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ.प्रा.संजय रामटेके, जिल्हा सचिव संजय खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रा.विजय सोमकुंवर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉ.प्रा. नागसेन शंभरकर, राकेश कालेश्वर,शहर अध्यक्ष संजय साखरे, शहर सचिव प्रा.भाऊराव मानकर,शहर कोषाध्यक्ष दिपक जुमडे , चंद्रपूर शहरातील सुप्रसिद्ध मानसिक रोग तज्ञ डॉ.सचिन भेदे इत्यादी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.अभिवादनाच्या कार्यक्रमा नंतर उपस्थित जनसमुदाया समोर संविधानाच्या उद्देशीकेचे वाचन करण्यात आले . कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन जिल्हा सचिव संजय खोब्रागडे यांनी केले.







