गुरुदेव सेवकांचा भव्य जिल्हा स्तरीय कार्यकर्ता मेळावा

468

चंद्रपूर – अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रम व्दारा संचालीत गुरुदेव सेवा मंडळ जिल्हा चंद्रपूर ग्रामगीता जीवन विकास परिक्षा विभाग जिल्हा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०३ सप्टेंबर २०२३, रोज रविवार, सकाळी ०९ ते सायंकाळी ०४ वाजेपर्यंत महेश भवन ख्रिचन हास्पिटल जवळ, ताडोबा रोड तुकुम चंद्रपूर येथे गुरुदेव सेवकांचा भव्य जिल्हास्तरीय मेळावा आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.ना.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक कार्य, मत्स व्यवसाय, तथा पालकमंत्री (चंद्रपूर, गोंदिया) यांच्या शुभ हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. लक्ष्मणराव गमे सर्वाधिकारी गुरुकुंज आश्रम तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. हंसराजजी अहिर अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी आयोग, मा. जनार्धन बोथे सरचिटणीस गुरूकुंज आश्रम, मा.आ. किशोरभाऊ जोरगेवार, मा. आ. सौ. प्रतिभाताई धानोरकर, प्रकाश महाराज वाघ प्रचार प्रमुख गुरुकुंज, गुलाबराव खवसे अध्यक्ष ग्रामगीता जीवन विकास परिक्षा विभाग गुरूकुंज, प्रमोद कडू लोकसभा प्रभारी, देवराव भोंगळे, राजुरा विधानसभा संयोजक, राहुल पावडे जिल्हा अध्यक्ष भाजपा, हरिष शर्मा जिल्हा अध्यक्ष ग्रामीण भाजपा, अशोक चरडे जिल्हा सेवाधिकारी, ॲड. दत्ताभाऊ हजारे, जिल्हा सेवाधिकारी, प्रेमलाल पारधी जिल्हाप्रमुख ग्रामगीता जीवन विकास परिक्षा, रुपलाल कावळे जिल्हा प्रचार प्रमुख, बंडोपंत बोडेकर ग्रामगीताचार्य, आशिष देवतळे, सौ. लता वाढीवे पोलीस निरीक्षक, डॉ. प्रेरणा कोलते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे आयोजन विजय चिताडे, पुरुषोत्तम सहारे, उमेश आष्टणकर, धर्माजी खंगार, पुंडलिक खनके, बाळकृष्ण झाडे, अनिता पिसे, चंदा इटनकर, कल्पना गिरडकर, सुनिता गुज्जनवार यांनी आयोजित केले आहे.