तालुक्यातील शशांक होणार पहिला आयआयटी अभियंता

379

जिवती (ता.प्र.) : तालुका अंतर्गत तेलंगणा राज्याच्या सीमेलगत वसलेल्या अतिदुर्गम व आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील मौजा येल्लापुर येथील नारायण गोविंदा ढगे यांचे सुपुत्र शशांक नारायण ढगे यांनी मेकॅनिकल शाखेतून JEE मुख्य परीक्षेत ९१.७६ % गुण मिळवून आयआयटी भुवनेश्वर येथे प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे शशांकवर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसून येत आहे.

इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भुवनेश्वर येथे निवड झालेला जिवती तालुक्यातून शशांक हा पहिला विद्यार्थी ठरला आहे.