महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलिक महासभा चंद्रपूरची बैठक संपन्न

846

चंद्रपूर: दिनांक १७जुलै२०२३ रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलिक महासभा च्या महत्त्वाच्या पदाधिकारी यांची बैठक पार पडली.सदर बैठक हि विभागीय कार्याध्यक्ष प्रकाश भाऊ देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यावेळी प्रांतिक तैलिक महासभा च्या संघटन वाढीसाठी प्रयत्न करणे, तालुका स्तरावर बैठकांचे नियोजन करणे, महिला, युवा आघाडी च्या संयुक्त संघटन वाढवुन समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून समाज बांधवांना सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करने, नाशिक येथे होणार्या बैठकीसाठी संदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या वेळे चंद्रपूर पुण्यनगरी वृतपत्राचे जिल्हा प्रतिनीधी मंगेश खाटीक यांची प्रांतिक च्या सोशल मिडिया जिल्हा प्रतिनिधी पदावर सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

या बैठकीला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चे विभागीय कार्याध्यक्ष प्रकाशजी देवतळे, प्रांतिक महासभेचे मार्गदर्शक श्री अजयभाऊ वैरागडे , चंद्रपूर महानगरपालिका माजी नगरसेविका, महिला आघाडी विभागीय कार्याध्यक्षा सौ. छब्बुताई वैरागडे ,प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा.निलेश बेलखेडे , युवा आघाडी जिल्हाकार्याध्यक्ष आशिष देवतळे,महिला जिल्हाध्यक्षा सौ श्रृतीताई घटे, शैलेश जुमडे, नवनियुक्त सोशल मीडिया जिल्हा प्रतिनिधी मंगेशजी खाटीक, रामदासजी बानकर,राहूल शीरसागर, प्रितम पाटणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.