कळमनाच्या येथील जंगलात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार.. दोघांवर गुन्हा दाखल; एक जेरबंद तर दुसरा पसार…

1540

बल्लारपूर:- तालुक्यातील कळमना येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची संतापजनक घटना समोर आली आहे. दोन नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. आरोपीने

घरी सोडून देण्याच्या बहाण्याने थेट जंगलात नेऊन एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमाने आळीपाळीने अत्याचार केला. त्या दोघांनी यावेळी या घटनेचा अत्याचाराचे चित्रीकरण केले. शिवाय या प्रकाराबाबत कुणालाही सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
ही धक्कादायक घटना बल्लारपूर तालुक्यातील कळमना जंगल परिसरात ६ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध बल्लारपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जंगलात नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी तिरुपती पोलादवार वय २२ वर्ष, रा. मुलचेरा, ता. गडचिरोली याला बेड्या ठोकल्या आहे. तर दुसरा आरोपी मोरेश्वर जंपलवार रा. केळझर, ता. राजुरा हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे. बल्लारपूर पोलिसांनी नराधम आरोपी तिरुपती पोलादवार यांना स्थानिक न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
सूत्राच्या प्राप्त माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही राजुरा तालुक्यातील केळझर येथे गेली होती. येथून ती आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघाली असता ती बामणी फाट्यावर ऑटोची वाट पहात उभी असताना तिथे तिरुपती पोलादवार व मोरेश्वर जंपलवार हे दोघे आपल्या दुचाकीने आले. आमच्यासोबत चल तुझे पैसे वाचतील, असे आमिष देत त्यांनी तिला दुचाकीवर बसवले. आणि जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. ही घटना समोर येताच संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.