Home मुंबई महाराष्ट्रातील चर्मोद्योगाचे उत्थान करण्यासाठी केंद्राच्या विविध यंत्रणांशी चर्चा…

महाराष्ट्रातील चर्मोद्योगाचे उत्थान करण्यासाठी केंद्राच्या विविध यंत्रणांशी चर्चा…

274

महाराष्ट्रातील चर्मोद्योगाचे उत्थान करण्यासाठी केंद्राच्या विविध यंत्रणांशी चर्चा करण्यात आली. यात केंद्रीय चर्म संशोधन संस्था चेन्नई सोबत महाराष्ट्रातील चर्मोद्योगाचे सर्वंकष सर्वक्षण करण्याबाबत, क्लस्टर धोरण ठरवण्यासाठी अभ्यासगट नेमण्याबाबत तसेच इतर राज्यातील चांगल्या धोरणांना महाराष्ट्रात स्वीकारण्यासाठी शिफारस करण्याच्या प्रस्तावावर सहमती दर्शविण्यात आली.

याबरोबरच काऊन्सिल फॉर लेदर एक्स्पोर्ट, केंद्रीय पादुका प्रशिक्षण संस्था, लेदर सेक्टर स्किल काऊन्सिल इत्यादी संस्थांशी देखील विविध विषयांवर करार करण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली.

लवकरच या सर्व प्रस्तावांवर कार्यवाही सुरु होणार असून याद्वारे सुवर्णजयंती वर्षात मोठ्या प्रमाणात चर्मकार समाजाचे उत्थान करण्याचा लिडकॉम चा प्रयत्न यशस्वी होईल अशी आशा आहे.

व्यवस्थापकीय संचालक लिडकॉम

Don`t copy text!