ओबीसी विद्यार्थ्याचे वसतीगृह व स्वाधार योजनेसंदर्भात ओबीसी मंत्री व सचिवांशी चर्चा… 72ओबीसी वसतीगृह व स्वाधार योजना त्वरित सुरु करा- प्रा.अनिल डहाके

290

चंद्रपूर ,दि.04- ,इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत(ओबीसी) इतर मागास प्रवर्ग,भटके विमुक्त आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी 72 वसतिगृहे व 21600 विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरु करण्याच्या मुद्याला घेऊन आज सोमवारला ४ जुलै रोजी ओबीसी बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे व उपसचिव दिनेश चव्हाण यांची भेट घेऊन विदर्भातील ओबीसी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या चर्चेच्यावेळी ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल डहाके, स्टुडटंस राईटस असो.चे अध्यक्ष उमेश कोराम,ओबीसी अधिकार मंचचे खेमेंद्र कटरे,ओबीसी कर्मचारी संघटनेचे एस.यु.वंजारी आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

दहावी,बारावीचे निकाल घोषित होवून जवळपास एक महिना उलटला आहे. इतर अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे ग्रामीण भागातील इतर मागास,भटके विमुक्त,विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा उच्च शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी यावे लागते.परंतु शहरात वास्तव्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना हलाकिचा सामना करावा लागतो आणि अनेक विद्यार्थी गरिबीमुळे शहरात येवूच शकत नाही. यामुळे इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात.ग्रामीण इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहे व अनुसूचित जातीच्या धर्तीवर स्वाधार योजना ओबीसी विद्यार्थ्यांना लागू व्हावी तसेच वसतीगृह तातडीने सुरु करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी मंत्री सावे यांनी वसतीगृह व स्वाधार योजनेवर काम सुरू असून प्रस्ताव मागवण्यात आल्याचे सांगितले.येत्या दोन दिवसात यावर बैटक घेण्यात येणार असल्याचे सांगितले.