उभरता कुस्तीपटू आर्यन अनिल बोरेकर…

579

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक चंद्रपूर)

चंद्रपूर: स्थानिक विठ्ठल मंदिर वॉर्ड चंद्रपूर येथील चिल्ड्रन्स अकादमी इथे दहावी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी आर्यन अनिल बोरेकर याने कुस्ती स्पर्धेत अनेक पुरस्कार प्राप्त करून अंडर 17 th मध्ये जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. आर्यन हा विठ्ठल व्यायाम शाळेचा खेळाडू असून त्याने आत्तापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त केले आहे.

यामध्ये राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा दुसरा क्रमांक, जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक, शालेय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. निंबाळा इथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी, ग्र्यापलिंग राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. आर्यन हा सद्या कुस्ती प्रशिक्षण घेण्यासाठी शिबिरात कोल्हापूर इथे गेलेला आहे. आर्यन हा येणाऱ्या काळात चंद्रपूर जिल्ह्याचे नाव चमकावणार असा आशावाद आहे. सर्व स्तरावरून आर्यन चे कौतुक होत आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय वडील व प्रशिक्षक यांना दिले आहे.