गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक : आरोपी फरार मूल पोलीसांची कारवाई

444

मूल : क्षमतेपेक्षा जास्त गोवंशीय जनावरांना वाहनामध्ये कोंबुन नेत असताना मूल पोलीसांनी शुक्रवारी रात्री 8 वाजता दरम्यान पकडुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र वाहन चालक वाहन ठेवुन फरार झाला असुन फरार वाहन चालकांवर विविध कलमांवन्ये मूल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.मूल तालुक्यातुन गेल्या काही दिवसांपासुन मोठया प्रमाणावर गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक केली जात आहे. दरम्यान सावली-मूल मार्गावरुन बोलोरो पिकअप चारचाकी वाहनातुन गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती मूल पोलीसांना मिळाली, माहितीच्या आधारे रेल्वे क्रॉसिंग जवळ सापळा रचुन उभे असताना मूल वरून चंद्रपूरकडे जात असलेल्या बोलोरो पिकअप वाहन क्रं. एम एच 34 ए बी 8835 हया वाहनाची तपासणी केली असता त्यावाहनामध्ये 6 बैल आढळुन आले. बैलाना लोहारा येथील श्री उज्वल गौरक्षण संस्थेमध्ये पाठविण्यात आले असुन वाहन जप्त करण्यात आले आहे. सदर बैलाची किंमत 60 हजार आणि वाहनाची किंमत 5 लाख रुपये आहे. वाहन पोलीस पकडताच वाहन चालक वाहन ठेवुन फरार झाला. आरोपीविरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 च्या विविध कलमांन्वये व प्राण्यांना कुररतेने वागणुक देण्यास प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मलिकाअर्जुन इंगळे, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय राध्येश्याम यादव, उत्तम कुमरे, सचिन सायंकाळ, पोलीस अमलदार मेश्राम करीत आहे.