Home Breaking News बिग राजकीय ब्रेकिंग: चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना पदावरून हटवले…

बिग राजकीय ब्रेकिंग: चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना पदावरून हटवले…

923

चंद्रपूर: जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी भारतीय जनता पक्षा सोबत अभद्र युती केली व निवडणुकी नंतर भोंगळे व देवतळे यांचा बेधुंद डांस सर्वत्र वायरल झाला होता.या युतीमुळे काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ व खिन्न व आक्रोशीत झाले होते झालेल्या प्रकाराची तक्रार पदाधिकाऱ्यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे दाखल केली होती.

मात्र सदर निवडणुकी पूर्वी प्रदेश काँग्रेसने भाजप व एकनाथ शिंदे गटा सह युती करू नये असा आदेश पारित केला असतांना त्या आदेशाला धुळकावून देवतळे यांनी केलेली युती त्यांच्या अंगलट आल्याने यापुढे पक्ष विरोधी कारवाई करणाऱ्यांवर वचक राहील असे सांगण्यात येत आहे.

Don`t copy text!