पतीला वाचवायला गेलेल्या पत्नीचा विजेच्या धक्क्याने मृत्यु

1281

चिमुर: शेतातील विजपंप सुरु करण्याकरीता रमेश खांबाजवळ गेला असता विजेचा धक्का लागल्याने ते खांबाला चिटकला.हे पाहताच पत्नीने घाबरून भ्रमणध्वनीवरून गावात कळविले. आणि स्वतः पतीला वाचविण्या करीता बांबूच्या काठीने सरीताने रमेशला सोडविले. मात्र हे करताना तीचा तोल गेल्याने जिवंत विजेच्या तारेला तिचा स्पर्श झाला व निपचित खाली पडली. लगेचच घटनास्थळावर नातलग व गावकऱ्यांनी येऊन पती-पत्नीला उपचारा करीता उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता पत्नी सरीता (वर्ष ३६) हिला मृत घोषीत केले.ही घटना ( ता.२१)शुक्रवारला सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.पती रमेशवर शालीकराम काळे यांच्यावर तातळीने उपचार झाल्याने त्याचा जीव वाचविला. शुक्रवारला चिमूरचा आठवडी बाजार असल्याने विक्री करण्याकरीता स्वतःच्या शेतात लावलेला भाजीपाला आणायला पती रमेश शालीकराम काळे यांच्यासोबत पत्नी सरीता काळे हे दोघेही सकाळी गेले होते.मृतक सरीता ही कळमगाव -चिखलापार गट ग्रामपंचायत येथील सदस्या होती.सदर घटनेची माहीती चिमूर पोलिसांना रुग्णालयाकडून झाल्यावर पोलिस हवालदार डोनु मोहुर्ले ,विनायक सरकुंडे यांनी रुग्णालय गाठून घटनेची नोंद केली.पुढील तपास चिमूर पोलिस स्टेशनचे ठानेदार मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे. मृतक ग्राम पंचायत सदस्या सरीता काळे यांच्या मृत्युने गावात शोककडा पसरली आहे.