व्यसनाधीन मद्यासक्ताच्या कुंटुबियांना आनंद व सुखाचे जीवन मिळावे यासाठी अँलअँनाॅन परिवार समुह करीत असलेले प्रयत्न समाजासाठी भूषणावह… -प्रा.शाम धोपटे

446

श्याम म्हाशाखेत्री (चंद्रपूर जिल्हा संपादक)

चंद्रपूर- अँलअँनाॅन परिवार समुह या आंतरराष्ट्रीय संगतीचा भाग असलेल्या “सुप्रभात अँलअँनाॅन परिवार समुह चंद्रपूर येथे स्थापन होऊन चार वर्ष पूर्ण झाले त्या प्रित्यर्थ ” मद्यपाश एक आजार” या विषयावर जनजागृती सभेचे आयोजन लोकमान्य टिळक विद्यालय, चंद्रपूर येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री श्रीराम पान्हेरकर होते, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सौ. नम्रता ठेमस्कर व प्रमुख वक्ता म्हणून प्रा. शाम धोपटे हे उपस्थीत होते.

सुप्रभात अँलअँनाॅन परिवार समुह व्यसनाधीन मद्यपीच्या कुंटुबियांना लाभ व्हावा यासाठी समुहाच्या माध्यमातून करीत असलेले प्रयत्न यातना भोगत असलेल्या मद्यपीच्या कुंटुबियांपर्यन्त संदेशाद्वारे पोहचवून तसेच सुख व आनंदाने परीपुर्ण भरलेले जीवन व्यसनाधीन मद्यपीच्या कुंटुबियांना मिळावे यासाठी कुठल्याही अपेक्षाची अपेक्षा न करता यासाठी अँलअँनाॅन परिवार समुह करीत असलेले प्रयत्न समाजासाठी भूषणावह असल्याचे प्रतिपादन प्रा. शाम धोपटे यांनी केले ते सुप्रभात समुहाच्या वर्धापनदिन सोहळ्यास अतिथी वक्ता म्हणुन मार्गदर्शन करीत होते.

शाम धोपटे मार्गदर्शनपर भाषणात पुढे बोलतांना म्हणाले की, स्त्रीयांना आपल्या वेदना मांडताना आपल्याला ही जागृती कशामुळे मिळाली याचे भान ठेवून स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेतांना मद्यासक्ताच्या कुटुंबीयांना सांभाळुन घेउन मदत करावी कारण या संघटनेत ईतकी शक्ती भरली आहे की, ज्यामुळे इतरांचे कल्याण कसे होईल हेच बघितल्या जाते
प्रमुख पाहुणे म्हणून म्हणुन बोलतांना सामाजिक कार्यकर्त्या सौ. नम्रता ठेमस्कर मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, आपल्या अवती भवती काय घडते हे पाहणे आवश्यक असुन नकळतपणे मद्यपाश आजारात अडकलेल्या माणसांना या आजारातुन बाहेर काढण्यासाठी ही अँलअँनाॅन परिवार संघटना कार्य करीत आहे, या आजारात कुठलेही औषध उपलब्ध नसल्यानंतर सुध्दा या आजारात अडकलेल्या माणसांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी मदत या समुहाच्या माध्यमातून केले जात आहे.

त्यामुळे पुनर्जीवन बहाल करना-या या संस्थे प्रती कृतज्ञ राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सौ. नम्रता ठेमस्कर यांनी केले
अध्यक्षीय भाषणात आपले मनोगत व्यक्त करतांना पान्हेरकर म्हणाले की, स्वता:च्या कुटुंबियांची स्वत: काळजी घेऊन कुटुंबातील व्यक्तींना सन्मान देणे आवश्यक आहे व हे काम या भगीणी खुप चांगल्याप्रकारे करीत आहे व या कार्यात शुभेच्छा प्रदान केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रभात समुहाच्या सदस्या सौ. मंजु झेड यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. किरण एम. यांनी केले. या कार्यक्रमास अँलअँनाॅन व ए. ए. सदस्य मोठ्या प्रमाणात हजर होते