बार्टी संस्थेत ७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा.

338

पुणे :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथे गुरुवार, दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
बार्टी, पुणे मुख्यालयाच्या प्रांगणातील तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण श्रीमती स्नेहल भोसले, अपर जिल्हाधिकारी तथा विभागप्रमुख बार्टी पुणे यांच्या हस्ते करण्यात आले.
संविधानाच्या सरनाम्याचे वाचन कार्यालय अधीक्षक श्रीमती संध्या नारखडे यांनी केले.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास श्रीमती स्नेहल भोसले विभागप्रमुख, श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक बार्टी पुणे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यालय अधीक्षक श्रीमती संध्या नारखडे, सुभेदार सचिन जगदाळे, श्री. राजेन्द्र बरकडे लेखाधिकारी, डॉ. सारिका थोरात, प्रकल्प व्यवस्थापक, डॉ. प्रेम हनवते, श्री. महेश गवई, यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे संचलित शासकीय सफाई कामगारांच्या मुला-मुलींची निवासी शाळा येरवडा, पुणे येथील मैदानावरील तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण श्रीमती स्नेहल भोसले अपर जिल्हाधिकारी तथा विभागप्रमुख बार्टी, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्रीमती इंदिरा अस्वार निबंधक बार्टी पुणे, डॉ. पायल डोके, व्यवस्थापक येरवडा, श्रीमती जयश्री चेंडके मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, येरवडा व्यवस्थापनातील अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.