अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा वाढदिवस महिला काँग्रेस कडून साजरा

432

चंद्रपुर: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महासचिव आदरणीय प्रियंका जी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्ष संध्या ताई सवालाखे यांनी अध्यक्षपदाची दोन वर्षे दमदारपणे पूर्ण केल्याबद्दल आज नागिनाबाग येथील चोखामेळा या मुलींच्या वसतिगृहात बिस्कीट व केप वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यर्थीनींनीच्या स्वागतगीताने झाली. त्यानंतर वसतिगृहाचे संचालक श्री. पुनवटकर यांनी वसतिगृहा संबंधी माहिती दिली. त्यानंतर वसतिगृहातील मुलींच्या हस्ते केक कापून प्रियंकाजी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी चंद्रपूर महिला काँग्रेस ग्रामीण च्या अध्यक्ष नम्रता आचार्य- ठेमस्कर, उपाध्यक्ष सुनीता धोटे, उपाध्यक्ष शितल कातकर, सेवादल महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्ष लता बारापात्रे, वसतिगृहाचे संचालक श्री.पुनवटकर, मंगला शिवरकर, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे, समता संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र डोंगरे, सामाजिक कार्यकर्ता पवन जगताप, इंडिया दस्तकचे मुख्य संपादक सूरज दहेगावकर यांच्या सह वसतिगृहातील सर्व विद्यार्थिनींची उपस्थिती होती.