Home Breaking News चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी कार्यालयात पीक विमा कक्ष स्थापन

चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी कार्यालयात पीक विमा कक्ष स्थापन

401

 

पीक विम्याचा लाभ मिळाला नसलेल्या शेतकऱ्यांना चंद्रपूर जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचे जाहीर आवाहन

चंद्रपूर: राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे संपूर्ण खरीप उद्धवस्त झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्याचे हप्ते भरले आहेत पण अद्यापही त्यांना शासकीय मदत किंवा पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्या शेतक-यांच्या मदतीसाठी प्रत्येक तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये पीक विमा मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

या कशांतर्गत जिल्हातील प्रत्येक तालूक्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये ज्या शेतक-यांनी पीक विमा भरला आहे, पण त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक व पीकविमा भरल्याची पावती (झेरॉक्स) ही कागदपत्रे प्रत्येक तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात जमा करण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केले आहे.

Don`t copy text!