हनुमान वारकरी भजन मंडळातर्फे काकड आरती एकादशी निमित्त रांगोळी स्पर्धा संपन्न…

509

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपुर)

चंद्रपुर दरवर्षी प्रमाणे यंदाही हनुमान वारकरी भजन विठ्ठल मंदिर वॉर्ड चंद्रपूर येथे काकड आरतीचा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने दिनांक 6.10.2022 रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी या हेतूने मंडळातर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेमध्ये तब्बल तीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.यामध्ये प्रथम क्रमांक कु. श्रावणी खनके, द्वितीय क्रमांक कु. तुलसी येरोजवर तर तृतीय क्रमांक मयुरी हिंगे हिने पटकाविला. यावेळेस उपस्थित मान्यवर यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ.संगीता ताई खांडेकर माजी नगरसेविका विठ्ठल मंदिर वॉर्ड चंद्रपूर, विनोद भाऊ शेरकी, राजेंद्र खांडेकर, तुळशीराम आंबटकर आणि परीक्षक म्हणून लाभलेले .प्रसिद्ध चित्रकार संजयजी वायकोर, संजय बनकर, संतोष वाकुडकर, सुधाकर बुटले सोबतच गणमान्य व्यक्ती तथा वॉर्डातील महिला व पुरुष यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेणारे हनुमान वारकरी भजन मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.