Home चंद्रपूर जिवती पोलिस स्टेशन पाटणच्या आयोजित शिबिरातून १२०० युवकांना लर्निग लायसन्स

पोलिस स्टेशन पाटणच्या आयोजित शिबिरातून १२०० युवकांना लर्निग लायसन्स

761

 

बळीराम काळे,जिवती

जिवती :(ता.प्र.) पोलीस अधीक्षक,चंद्रपूर,
उपविभागीय पोलिस अधिकारी, गडचांदुर यांची संकल्पणा व मार्ग दर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या सहकार्याने व पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार शहाजी घोडके यांच्या पुढाकारातून चंद्रपूर पोलीस दलामार्फत अतिदुर्गम जिवती तालुक्यातील नागरिकांकरीता वाहतूक नियमाबाबत जनजागृती मोहीम व शासकीय शुल्कात लायन्सस काढून देण्याकरिता पोलीस स्टेशन पाटण अंतर्गत विशेष ड्रायव्हिंग लायसन्स शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात पोलीस दलामार्फत गावोगावी जाऊन माहिती देण्यात आली होती.
तालुक्यातील प्रत्येक नागरीकानी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण १२०० पेक्षा जास्त नागरिकांचे लर्निग लायसन्स पाटण पोलीस स्टेशन आयोजित शिबिरात काढून देण्यात आले आहे.
लवकरच नवे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी,उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन पाटण येथे लायसन्स ट्रायल कॅम्प आयोजित करण्यात येत आहे.

Don`t copy text!