मा. सा.कन्नमवार मॉडेल ग्राम पथक अधिकाऱ्यांनी केली पानोरा ग्रामपंचायतिचे परीक्षण

470

 

गोंडपीपरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पानोरा ग्रामपंचायतीची भेट घेऊन मा.सा.कन्नमवार ग्राम पथक अधीकार्यांनी विविध कामकाजाची पाहणी केली.
यात गावातिल वैयक्तिक शौचालय, नळ जोडणी,रोजगार हमी अंतर्गत जॉब कार्ड ,स्मशानभूमी ,वृक्ष लागवड,आरोग्य शिक्षण,अंगण वाडी विभाग,ग्राम वाचनालय यासह अनेक विकास कामाचे व्यवस्थापण यांचे पाहणी केली.
दरम्यान परीक्षण मुख्याधिकारी मरसकोल्हेनी नागरीकांशी संवाद ही साधला.
यावेळी परीक्षण अधिकारी मरसकोल्हे , देवतळे विस्तार अधिकारी ,शिंदे, सावसागडे,अमोल वानखेडे,बी.एम.गोंडपीपरी, सचिव पी.डी.राऊत ,सरपंच जनार्धन ढूमने, सविता डोके उपसरपंच, ग्रा.प.स.गिरसावळे ,निरंजन गोंगले,यासह आशा वर्कर, अंगण वाडी सेविका, तमुस अध्यक्ष जिल्ह्या परिषद शाळेचे मुख्याध्यापक यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.