Homeचंद्रपूरजिवतीतेलंगणा राज्याच्या सीमा लगतच्या वादग्रस्त १४ गावांची पुन्हा होणार महसुली मोजणी

तेलंगणा राज्याच्या सीमा लगतच्या वादग्रस्त १४ गावांची पुन्हा होणार महसुली मोजणी

बळीराम काळे,जिवती

जिवती(ता.प्र.) तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमा लगत वसलेले ती १४ गावे हे महाराष्ट्रा व तेलंगणा राज्याच्या सीमावादात अडकलेल्या वादग्रस्त १४ गावांच्या सिमांकनाबाबत २५ वर्षापासून अजून कोणताही तोडगा लागला नाही. लोकप्ररतिनिधींकडून शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला.असल्यामुळे आता शासनाने याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा अधीक्षक,भूमी अभिलेख विभाग चंद्रपूर यांनी १४ गावांचे सिमांकान तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.यामुळे वादग्रस्त १४ गावांच्या सिमांकानाचा मार्ग मोकळा झाला आहे.
तालुक्यातील एकूण ८३ महसुली गांवापैकी ७५ गवांचाच रेकॉर्ड महसुली विभाग तसेच भुमी अभिलेख कार्यालयाकडे उपलब्ध आहे.
परंतु आठ महसुली गावे व सहा गुडे अशा एकूण १४ गांवाचा रेकॉर्ड मागील ४० वर्षापासून उपलब्ध नाही आहे.
पिढ्यापिढ्या कसत असलेल्या १४ गावांतील २,३८७ हेक्टर जमिनीची राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने त्या १४ गावांची महसुली मोजणी होणार आहे.
त्यामुळे चौदा गावातील शेकऱ्यांना त्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीचा मालकी हक्क मिळणार आहे.याबाबत मुकदमगुडा येथे गुरुवारी सभा आयोजित करण्यात आली.
यात भुमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधिक्षक प्रमोद घाडगे यांनी १४गावांच्या मोजणीसाठीची कार्यपद्धती सांगितली.तसेच तहसीलदार प्रवीण चिडे यांनी महसूल मोजनीला सर्वांचे सहकार्य असावे;आणि १ ऑगष्ट २०२२ पासून निवडणूक आयोगाने मतदार यादीसोबत आधार लिंक करण्याचा कार्यक्रम आयोजिलेला आहे.
या सर्व १४ गावातील जनतेने महाराष्ट्र राज्याच्याच यादिसोबतच आधार लिंक करून घेण्याचे आवाहन केले.

तसेच १९८० पासून आपर्यंत सिमावादात अडकलेल्या त्या १४ गांवाचा मूळ अभिलेखच तयार झालेला नाही. पिढ्यन्पिढ्या कसत असलेल्या जमिनीची मालकी,भुमी अभिलेख तयार करण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या नर्देशानुसार १५ सप्टेंबरपासुन होणार आहे.त्यास सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.जोपर्यंत नागरिकांना पक्के पट्टे मिळत नाहीत,तोपर्यंत मी स्वत बसणार नाही.असे विधान आमदार सुभाष धोटे यांनी केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!