अतिवृष्टी बाधितांना मिळाला भाजपा युवक पदाधिकाऱ्यांकडून आधार…

401

शरद कुकुडकार
भंगाराम तळोधी प्रतिनिधी

भंगाराम तळोधी:- यंदाच्या अती पावसामुळे जनतेला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. गोरगरीब जनता निसर्गाचा प्रकोपाचे शिकार झाली. दिवसागणिक न ओसरणाऱ्या पावसामूळे अनेकांचे छत्र नाहीसे होत आहे.

सततच्या पावसामूळे गोंडपिपरी तालुक्यातील फूलोराहेट्टी, भंगाराम तळोधीतील मारोती रामदास फुलझेले, लच्चय्या अप्पनवार, रघुनाथ गेडाम, कल्पना बंडू वेलादी, पर्वताबाई शंकर वेलादी, निखिल शेडमके, सागर एकनाथ गेडाम, सतीश पिल्ललवार, मंदाबाई सुरेश सिडाम यांना फटका बसला आहे. सोबतच खूप नुकसान सुद्धा झाले.

त्यामुळे या कूटूंबासाठी माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांनी आधार बनून त्यांचा घरांची पाहणी केली आणि त्यांचा कूट॔बासाठी अन्नधान्य किट दिले. तसेच शासनाकडून मदत मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले. वेळेवर संकट परिस्थितीत मदत केल्याबद्दल त्यांनी अमरभाऊंचे आभार मानले.

यावेळी भंगाराम तळोधीचे सरपंच सौ लक्ष्मीताई सोमेश्वर बालूगवार, उपसरपंच सूनिलभाऊ घाबर्डे, ग्रा पं.सदस्या सौ गीताताई बूर्रीवार, सौ ममताताई कोवे,माजी सरपंच सौ माधुरीताई गेडाम, माजी उपसरपंच मारोती अम्मावार, प्रकाश चौधरी, कमलेश गेडाम, सत्यवान मडावी, प्रशांत कळाबे,भारत वेलादि, अजय मेश्राम, गणेश भारशंकर, विश्वनाथ डोंगरे व गावकरी उपस्थित होते.