बार्टीमार्फत महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांकरिता एक दिवसीय ॲट्रॉसिटी कार्यशाळेचे आयोजन

485

दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा संपादक

नागपूर: – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांकरिता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ व सुधारित अधिनियम २०१६ अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे बुधवार दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या वेळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांस्कृतिक हॉल,दिक्षाभूमी रोड, श्रध्दानंद पेठ, नागपूर ४४००२२ येथे आयोजित करण्यात आले असून या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पत्रकारांनी आपली नाव नोंदणी कार्यालयीन वेळेत दि. १२/०८/ २०२२ पर्यंत ८००७३८५९९७ / ८२७५७३०३५७ या क्रमांकावर करावी. दि. १२/०८/२०२२ नंतर नोंदणी केली जाणार नाही याची नोंद घ्यावी. असे आवाहन बार्टी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.