वरूर रोड येथे मंदिराच्या परिसरात युवकांनी केले वृक्षारोपण

714

वरूर रोड: येथील हनुमान मंदिराच्या खुल्या परिसरात १७ जुलै रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास युवकांतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी चाफा, आंबा,कडुलिंब, जास्वंद, गुलाब, चमेली आदी प्रकारची एकूण ५० फुले व फळांची झाडे लावण्यात आले.दरवर्षी वरूर रोड येथील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयातर्फे वृक्षारोपण करण्यात येते.

कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये जगात ऑक्सिजन अभावी कित्येक लोकांना प्राण गमवावे लागले. याची जाणीव ठेवून प्रत्येकाने एकतरी झाड लावून त्याचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज आहे. झाडांची संपूर्ण व्यवस्था राहुल धानोरकर यांनी केली. सदर उपक्रमात अशोक आत्राम, राकेश लांडे, केतन जयपुरकर, सुनील चोथले, तुषार जीवतोडे, राहुल धानोरकर, बादल भोंगळे, कार्तिक धोबे, आदित्य निमकर,केतन पिंपळशेंडे, सागर बाकेवार, आदित्य बोरकुठे, धानोरकर आदी युवक उपस्थित होते.