Home Breaking News अडेगाव येथे सर्पमित्राने नागसापास पकडून केले निसर्गमुक्त

अडेगाव येथे सर्पमित्राने नागसापास पकडून केले निसर्गमुक्त

488

गोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथे आज दि.1एप्रिल रोज शुक्रवारला सर्पमित्राद्वारा नाग सापास पकडून निसर्गमुक्त करण्यात आले.अडेगाव येथील रवींद्र येलमुले यांच्या घरी साप असल्याची माहिती अजय येलमुले यांनी सर्प मित्र आकाश दुर्गे आणि पंकज नागापुरे यांना भ्रमणध्वनीवर दिली.
सर्पमित्र दुर्गे व नागापुरे यांनी येलमूले यांचे घर गाठले.

घरात पाहणी केली असता घरात एका भिंतीच्या फटीत साप दडून बसला होता . पाहणी केली असतासदर साप हा नाग साप असल्याचे समजताच मोठ्या शिताफीने सर्पमित्रानी नाग भिंतीत दडून बसलेल्या नाग सापास बाहेर काढले. आणि
निसर्ग मुक्त करण्यात आले आहे.

Don`t copy text!