Home Breaking News महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

413

चंद्रपूर  : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार तसेच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 26 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता वरोरा येथे आगमन व वरोराच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट. दुपारी 12:30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 1:30 वाजता चांदा क्लब, वरोरा नाका, चंद्रपूर येथे आगमन व स्पोर्ट्स अकॅडमी उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.45 वाजता खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या लोकमान्य विद्यालयासमोरील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित.

दुपारी 2 वाजता शकुंतला लॉन येथे कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता जिल्ह्यातील विविध विषयासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 4 30 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

 

Don`t copy text!