Home Breaking News देवदा-रेगडी मार्गावर दुचाकीचा अपघात.. अपघातात फुसगुडा येथील इसम ठार

देवदा-रेगडी मार्गावर दुचाकीचा अपघात.. अपघातात फुसगुडा येथील इसम ठार

1347

ब्युरोचीफ प्रशांत शाहा

रेगडी : काल सायंकाळी (02/01/2022)रेगडी येथून अवघ्या दोन किमी अंतरावर देवदा मार्गाने येत असलेल्या दुचाकी चालकाचे वाहनवरून नियंत्रण सुटल्याने दुचाकी क्र. MH 29 BH 1263 या दुचाकीची झाडाला जोरदार धडक बसली यात रेगडी जवळच असलेल्या पुसगुडा येथील गुरुदास पोटावी वय वर्ष सुमारे 38 या इसमाचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री सिनुकुमार बानोत साहेब यांचा नेतृत्वाखालीस.फौ श्री यशवंत वलथरे,ना.पो.शी.शेखर मडावी पो.अ नरेंद्र धोंडणे हे करत आहेत.परत आज सकाळी सुमारे 11 वाजताच्या सुमारास उडेरा येथील सुनंदा वनकर व चोकाजी वणकर हे दोघेही रेगडी गावाजवळ अपघातात जखमी झाले.

रेगडी येथील समाज सेवक अमित चक्रवर्ती,रमेश पावे,अनिता पोटावी, प्रतिम गेडाम,व प्रशांत शाहा यांनी जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र रेगडी येथे उपचारा करिता दाखल केलेमागील काही दिवसात रेगडी,देवदा,घोट या मार्गावर अनेक अपघात होत असल्याचे चित्र दिसत आहे.तरी या मार्गावर दिशा दर्शक फलक लावण्यात यावी अशी मांगणी होत आहे.

Don`t copy text!